Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

CTET Exam Date 2026 : Admit Card, Previous Year Question Paper 1 and 2 with Answer Key

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) परीक्षेची सुधारित तारीख जाहीर झाली असून, Admit Card, परीक्षा सेंटर तसेच CTET Previous Year Question Paper 1 and 2 with Answer Key लिंक या लेखात दिली आहे.

CTET Exam Date

CTET Exam Date 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET च्या 22 व्या आवृत्तीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) CTET Exam Date 2026 परीक्षेची सुधारित तारीख (CTET Exam New Date 2026) जाहीर करण्यात आली आहे. या लेखात परीक्षेची सुधारित तारीख, परीक्षा सेंटर आणि Admit Card Download तसेच CTET Question Paper 1 and 2 With Answer Key PDF डाउनलोड डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.

CTET Exam Date 2026

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test – CTET) ची 22 वी आवृत्ती दिनांक 12 आणि 13 डिसेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

प्रत्येक उमेदवाराला परीक्षा शहर (Examination City) आणि परीक्षा दिनांक याबाबतची माहिती परीक्षा होण्याच्या 15 दिवस आधी CTET च्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल.

तसेच, परीक्षा केंद्राची (Examination Centre) माहिती असलेले प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधी CTET पोर्टलवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

CBSE च्या 25 ऑगस्ट 2026 रोजीच्या सार्वजनिक सूचनेनुसार, CTET च्या 22 व्या आवृत्तीसाठी यापूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 मे 2026 ते 10 जून 2026 या कालावधीत सुरू होती.

त्यानंतर काही पात्र उमेदवारांना अर्ज करता यावा यासाठी ऑनलाइन अर्ज पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले. ही अतिरिक्त अर्ज प्रक्रिया 25 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत होती. मात्र त्यास पुन्हा 6 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

त्यामुळे CBSE ने स्पष्ट केले आहे की, 22 व्या CTET परीक्षेची सुधारित तारीख (CTET Exam New Date 2026) ऑनलाइन अर्ज पोर्टल बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे आता CTET Exam Online Application Correction Window अर्जातील दुरुस्तीसाठी 10 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. Admit Card व इतर सुचनांसाठी उमेदवारांनी वेळोवेळी CTET च्या अधिकृत CTET वेबसाइटवरील पुढील सूचनेकडे लक्ष ठेवावे.

PUBLIC NOTICE: Exam Dates for 22nd edition of CTET

PUBLIC NOTICE Exam Dates for 22nd edition of CTET

CTET Exam Hall Ticket Date 2026

परीक्षा केंद्राची (Examination Centre) माहिती असलेले प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधी म्हणजेच दिनांक 12 आणि 13 डिसेंबर 2026 रोजी परीक्षा असल्याने 2 दिवस आधी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी हॉल तिकीट CTET पोर्टलवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

CTET Exam Official Website

उमेदवारांनी CTET परीक्षा तारीख आणि Hall Ticket बाबतची माहिती केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच तपासावी. सध्या अधिकृत CTET वेबसाइटवर 22 व्या आवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भातील सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

अधिकृत वेबसाइट: CTET Official Website

CTET Previous Year Question Paper 1 and 2 with Answer Key

CTET Question Paper Feb 2026 Download

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment