Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ! 7 महिन्यांची थकबाकी ऑगस्टच्या वेतनासोबत मिळणार

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय

Dearness Allowance Increase GR

Dearness Allowance Increase GR: राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह राज्यातील पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे. 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनरचनेतील मूळ वेतनावर मिळणारा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्के करण्यात आला असून, ऑगस्टच्या महिन्याच्या वेतनासोबत वाढीव दराने 7 महिन्याच्या फरकासह मिळणार आहे.

Dearness Allowance Increase AUG 2026

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2026 पासून सुधारणा करण्याबाबत वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 18/8/2026 रोजी निर्गमित केला आहे.

महागाई भत्ता वाढ शासन निर्णय 18/8/2026 | Dearness Allowance Increase GR

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार शासनाने असे आदेश दिले आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२६ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५८% वरुन ६०% करण्यात यावा.

सदर महागाई भत्ता वाढ ७ महिन्यांच्या (माहे जानेवारी, २०२६ ते जुलै, २०२६ या कालावधीतील) थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहतील.

यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०८१८१८०३४८४९०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी : महागाई भत्ता वाढ 60 टक्के शासन निर्णय 18/8/2026 डाउनलोड करा

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment