Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

CET Cell Professional Admission Notice 2026

CET Cell Professional Admission Notice

CET Cell Public Notice Professional Admission : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Cell) उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, औषधोपचार/आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (Centralized Admission Process (CAP)-2026-27) राबविण्यात येत आहे.

नवीन अपडेट : जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ; परिपत्रक जारी

या प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने अनेक अर्जदारांनी अर्ज सादर करताना विविध त्रुटी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आपल्या प्रवेश अर्जातील त्रुटी तातडीने दूर करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना एसएमएस (SMS), ई-मेल तसेच पत्राद्वारे कळविण्यात येत आहे. तथापि, अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अर्जदाराची असून, प्रत्येक अर्जदाराने आपल्या अर्जाची सद्यस्थिती (Application Status) तपासून आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अर्जदारांची गैरसोय होऊ नये आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करता यावी, यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची (Caste Certificate Verification Committee) कार्यालये आवश्यकतेनुसार सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याबाबत महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जामध्ये नमूद असलेल्या त्रुटींची अद्याप पूर्तता केलेली नसल्यास त्यांनी विलंब न करता संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरित संपर्क साधून आवश्यक त्रुटींची पूर्तता करून घ्यावी. त्रुटींची पूर्तता न झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत (Professional Course Admission Process) अडथळा निर्माण होऊ शकतो.

विद्यार्थ्यांनी वेळेत आवश्यक कार्यवाही करून जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील त्रुटी दूर कराव्यात. त्रुटींची पूर्तता झाल्यानंतर संबंधित प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून नियमानुसार निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणेच्या महासंचालक तथा राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या मुख्य समन्वयकांकडून कळविण्यात आले आहे.

All Courses Under Technical Education courses

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment