SQAAF School Visit Guidelines 2026: शाळा गुणवत्त्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत आता राज्यातील शाळांना भेटी देण्याबाबत शिक्षण विभागाने 13 महत्वाच्या सुचनाचे परिपत्रक दिनांक 21 ऑक्टोबर 2026 रोजी निर्गमित केले आहे. या लेखात SQAAF School Wise Dashboard Report Link दिली आहे.
Table of Contents
SQAAF Full Form: School Quality Assessment and Assurance Framework
SQAAF मूल्यांकनात अव्वल शाळांना भेटी
राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे.
सन २०२४-२०२५ मध्ये राज्यातील १,०२,६७५ शाळांनी स्वयंमूल्यांकन पूर्ण केले. तसेच सन २०२४-२०२५ मध्ये स्वयंमूल्यांकनात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांपैकी सन २०२५-२०२६ मध्ये १०,७१२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी १०,६४४ शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले.
तसेच सन २०२५-२६ मध्ये स्वयंमूल्यांकन दिनांक १५ मार्च २०२६ ते १८ मे २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे.
SQAAF School Wise Dashboard Report Link
दिनांक 21 ऑक्टोबर 2026 रोजीच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहे की, आपल्या जिल्ह्यातील तालुकानिहाय SQAAF मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या शाळांची माहिती maa.ac.in या संकेतस्थळावरील SQAAF विभागामध्ये देण्यात आलेल्या SQAAF Dashboard मधून घेण्यात यावी. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
स्टेप 1 : www.maa.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : आता तिथे SQAAF विभाग मधून अ. क्र. 3 मध्ये SQAAF DASHBOARD यावर क्लिक करा.
स्टेप 3 : आता SQAAF Dashboard दिसेल तिथून तुम्ही SQAAF STATE DASHBOARD
YEAR>> BOARD>>MEDIUM>>MANAGEMENT>>CATEGORY>>TYPE>>DISTRICT>>BLOCK>>CLUSTER निवडून रिपोर्ट पाहू शकता.

SQAAF School Wise Dashboard Report Link
SQAAF मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शाळांना इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनी भेटी देऊन शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी आपल्या स्तरावरून मार्गदर्शन करण्यात यावे. शाळा भेटी देताना खालील सूचनांचे पालन करावे.
शिक्षण विभागाच्या 13 महत्त्वाच्या सूचना जाहीर
१. तालुकानिहाय सर्वाधिक गुण मिळविलेल्या शाळांनाच भेट देण्यात यावी.
२. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेली शाळा ही आपल्याच केंद्रातील किंवा जवळच्या केंद्रातील असावी.
३. शाळा भेटीचा दिनांक निश्चित करून गटशिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. गटशिक्षणाधिकारी यांनी शाळा भेटीबाबत मान्यता दिल्यानंतरच शाळा भेट करता येईल. पूर्वपरवानगीशिवाय मुख्याध्यापकांना शाळा भेट करता येणार नाही.
४. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या शाळेला किमान ३ दिवस आधी पूर्वसूचना देण्यात यावी.
५. भेटीसाठी निवडण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
६. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या शाळेला कोणताही आर्थिक खर्च येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. स्वागत समारंभाचे कार्यक्रम टाळावेत. शाळा भेट ही शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी असावी.
७. भेट देण्यासाठी शासकीय वाहनांचाच (बस, रेल्वे) वापर करावा. खासगी किंवा अनधिकृत वाहनातून प्रवास करू नये.
८. शाळा भेटीसाठी कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
९. भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या शाळेला मुख्याध्यापक व शाळेतील SQAAF चे कामकाज पाहणारे एक शिक्षक यांनीच भेट द्यावी. सदर भेट नियोजित असावी व वर्षातून एक दिवसच देण्यात यावी. द्विशिक्षकी शाळेतून फक्त मुख्याध्यापक यांनीच शाळा भेटीचे नियोजन करावे.
१०. शाळा भेट देणाऱ्या मुख्याध्यापकांनी आपली शाळा बंद राहणार नाही, याची दक्षता घेऊन नियोजन करावे व त्यानंतरच शाळा भेटीचा दिनांक निश्चित करावा.
११. शाळा भेट देणाऱ्या मुख्याध्यापकांनी SQAAF संदर्भातील क्षेत्र, उपक्षेत्र, मानकनिहाय शाळेच्या उल्लेखनीय बाबी, सुधारात्मक बाबी, लिंकवर भरलेली माहिती, पुरावे तसेच SQAAF संदर्भात शाळेने केलेले नियोजन या बाबींवर सकारात्मक चर्चा करावी.
१२. शाळा भेट देणाऱ्या मुख्याध्यापकांनी शाळा भेटीवरून आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा भेटीबाबत चर्चा करावी.
झालेली चर्चा इतिवृत्तात नमूद करावी व सर्वांच्या सहकार्याने शाळा विकास आराखडा तयार करावा. सदर शाळा विकास आराखड्यास मान्यता घेण्यात यावी व शाळेचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
१३. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत स्वयंमूल्यांकन व बाह्य मूल्यांकनात चांगली कामगिरी करणाऱ्या शाळा इतर शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रेरणा देतील आणि मार्गदर्शन करतील.
वरीलप्रमाणे शाळा भेटीबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात व जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
अधिक माहितीसाठी : SQAAF अंतर्गत मुख्याध्यापकांनी शाळा भेटी देणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा












