Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

शिक्षकांच्या अर्जित रजा नोंद सर्व्हिस बुकात करणेबाबत अत्यंत महत्वाचे परिपत्रक

Teacher Earned Leave Circuler

Teacher Earned Leave : जनगणना व बीएलओ चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करणेबाबत शिक्षण संचलनालय कार्यालकडून शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.

शिक्षकांच्या अर्जित रजा नोंद सर्व्हिस बुकात करणेबाबत परिपत्रक

“जनगणना व BLO” चे राष्ट्रीय कर्तव्य करणाऱ्या शिक्षकांच्या अर्जित रजेची नोंद सर्व्हिस बुकात करणेबाबतचे अध्यक्ष, शिक्षक महासंघ कोकण विभाग, निमंत्रित सदस्य प्रदेश कार्यकारिणी भाजपा महाराष्ट्र यांचे दि.११ मे, २०२६ चे निवेदन मा. शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडुन संचालनालयास प्राप्त झाले आहे. (प्रत संलग्न)

विषयांकित निवेदनामध्ये नमुद करण्यात आल्यानुसार, “महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८० अन्वये सुट्टी काळात काम केल्यास शिक्षकांना अर्जित रजा देता येते. तसेच या अर्जित रजेची नोंद शिक्षकांच्या सर्व्हिस बुकात करता येते, तथापि अनेक शाळांमध्ये ह्या रजा सर्व्हिस बुका मध्ये मांडल्या जात नाही आणि शिक्षकांना या बदली रजांचा लाभ देत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात.

राज्यातील हजारो शिक्षकांच्या सेवा “जनगणना तसेच बी.एल.ओ.” च्या कामासाठी अधिग्रहित केल्या असून मे महिन्याच्या हक्काच्या सुट्टीतही शिक्षकांना हे काम करावे लागत आहे.

रजेच्या कालावधीत (उन्हाळी, हिवाळी सुट्ट्या) काम केल्यास शिक्षकांना त्यांच्या सर्व्हिस बुक (सेवा पुस्तक) मध्ये नोंद करता येते आणि अशा कामासाठी ‘अर्जित रजा (Earned Leave EL) मिळण्याचा अधिकार असतो. काम पूर्ण केल्यावर सेवेच्या पुस्तकात (Service Book) या कालावधीची नोंद करणे अनिवार्य आहे.

अर्जित रजा (Earned Leave) सुट्टीच्या काळात काम केल्यास, जितके दिवस काम केले आहे. त्या प्रमाणात अर्जित रजा कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा केली जाते त्याची नोंद सर्व्हिस बुकात केली जाते” असे नमुद करण्यात आले आहे.

विषयांकित निवेदनातील बाब ही धोरणात्मक स्वरुपाची असल्याने याअनुषंगाने शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक वाचा.

zp eacher Earned Leave Circuler

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment