Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

शैक्षणिक कामकाज नियोजन सप्टेंबर २०२६ दुसरा आठवडा

शैक्षणिक कामकाज दैनंदिन, दरमहा करावयाचे शैक्षणिक कामकाज नियोजन २०२६-२७ दिनदर्शिका PDF Download लिंक व सविस्तर माहिती.

shaikshnik kamkaj niyojan

Shaikshnik Kamkaj Niyojan 2026-27 : शालेय शिक्षण विभागाअंतर्गत अध्ययन-अध्यापन ते शालेय प्रशासकीय कामकाज, शैक्षणिक उपक्रम संदर्भातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शैक्षणिक कामकाज दैनंदिन, दरमहा करावयाचे नियोजन २०२६-२७ दिनदर्शिका (कॅलेंडर) PDF Download लिंक व सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

शैक्षणिक कामकाज नियोजन दैनंदिन करावयाची कामे

DAINANDIN SHAIKSHNIK KAMKAJ NIYOJAN

१. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गुणवत्तापूर्ण होण्यासाठी आवश्यक साधनतंत्रे, अध्यापनपद्धती यांचे नियोजन करून वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजनाप्रमाणे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया करणे, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे.

२. शाळेचा परिसर, स्वच्छतागृह, वर्गखोल्या, पिंक रूम, ग्रंथालय, प्रयोगशाळा इत्यादींची स्वच्छता करून परिपाठ घेणे. (हात धुणे, शरीर स्वच्छता, मूल्यसंस्कार आणि वडीलधाऱ्यांना नमन)

३. ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत आहार वाटप करणे व लाभार्थी संख्येची PM Poshan पोर्टलवर नोंद करणे.

४. VSK पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे.

दरमहा करावयाची कामे

DARMAHA SHAIKSHNIK KAMKAJ NIYOJAN

१. अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेणे. आवश्यकतेनुसार उपचारात्मक अध्यापन करणे.

२. शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना प्रशिक्षण देणे. (५० तास CPD)

३. विविध स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.

४. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे. विविध शैक्षणिक साहित्यनिर्मिती करणे.

५. ‘आनंददायी शनिवार‘ उपक्रम राबवणे.

६. विद्यार्थी लाभाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे,

७. शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना दाखला देणे तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना गरजेनुसार बोनाफाईड सर्टिफिकेट देणे.

८. FLN अंतर्गत मातागटाच्या WhatsApp ग्रुपवर पालकांना व्हिडिओ पाठवणे.

९. महिनाअखेरीस मासिक पत्रके, उपस्थिती भत्ता इत्यादी माहिती देणे.

१०. ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत तांदूळ व धान्यादी मालाची मागणी करणे, तो माल शाळेत पावतीप्रमाणे उतरवून घेणे, व्यवस्थित ठेवणे, त्याची देखभाल करणे, नियमित हिशोब ठेवणे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीप्रमाणे दररोज पोषण आहार शिजवून देणे, यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

११. प्रत्येक महिन्यातील ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत इंधन, भाजीपाला व पूरक आहार देयक यांची ऑनलाइन तपासणी करणे व प्राप्त अनुदानातून देयक अदा करणे.

१२. सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांतर्गत रोजकीर्द, खतावणी, दरपत्रक निविदा फाईल, व्हाउचर (पावती) फाईल, साठा नोंदवही व इतिवृत्त इत्यादी रेकॉर्ड तयार करणे.

१३. शाळेतील सर्व प्रकारच्या अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे.

१४. शालार्थ प्रणालीद्वारे शिक्षक वेतन देयक तयार करून DDO2 कडे पाठवणे.

१५. विविध संस्था/NGO यांच्याशी झालेल्या करारानुसार राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१६. UDISE + पोर्टल-विद्यार्थी IMPORT, Left with TC करणे, आधार, अपार, भौतिक सुविधा इ. माहिती अपडेट करणे.

१७. केंद्रशासन व राज्यशासन स्तरांवरून वेळोवेळी सूचित केलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

१८. जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, किशोर या मासिकांमधील आवश्यक उपक्रम शाळेत राबवणे.

१९. शालेय स्तरावरील विविध समित्यांच्या बैठकांचे आयोजन करणे.

२०. शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेणे,

शैक्षणिक कामकाज नियोजन सप्टेंबर २०२६ पहिला आठवडा

SHAIKSHNIK KAMKAJ NIYOJAN Sep

१. आकारिक मूल्यमापन चाचणी क्र. १ (इयत्ता पहिली ते आठवी) / घटक चाचणी क्र. १ (इयत्ता नववी ते बारावी) मधील संपादणुकीनुसार, आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करणे.

२. Hackathon प्रशिक्षण – विद्यार्थी, शिक्षक ऑनलाइन नोंदणी करणे.

३. ‘शिक्षकदिन’ (५ सप्टेंबर) साजरा करणे.

४. राजे उमाजी नाईक जयंती (७ सप्टेंबर) साजरी करणे.

५. पोषण पंधरवडा (१ ते १५ सप्टेंबर) आयोजन करणे.

६. साक्षरता सप्ताहाचे आयोजन करणे.

७. वीरगाथा कार्यक्रमात सहभागी होणे.

शैक्षणिक कामकाज नियोजन सप्टेंबर २०२६ दुसरा आठवडा

१. UDISE + DCF प्रश्न डाउनलोड करणे, ऑनलाइन माहिती भरणे.

२. UDISE + वर शाळेची माहिती तपासून घेणे.

३. इयत्ता दहावी व बारावी राज्य मंडळ परीक्षांचे आवेदनपत्र भरून घेणे.

४. पोषण पंधरवडा (१ ते १५ सप्टेंबर) आयोजन करणे.

५. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन (१३ सप्टेंबर) साजरा करणे.

६. ‘राष्ट्र प्रथम’ उपक्रमांतर्गत आत्मरक्षा प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, सैनिक प्रशिक्षण, शैक्षणिक प्रबोधन.

७. ‘एक पेड़ माँ के नाम’ वृक्षारोपण उपक्रम आयोजन करणे.

शैक्षणिक कामकाज नियोजन सप्टेंबर २०२६ तिसरा आठवडा

१. UDISE + पोर्टलवर विद्यार्थी, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरणे व शाळेचा ड्रॉप बॉक्स शून्य करणे.

२. केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती (१७ सप्टेंबर) साजरी करणे.

३. परसबागा स्पर्धेसाठी आवश्यक पूर्वतयारी करणे.

४. शालेय बँड स्पर्धेमध्ये सहभागी होणे.

५. ‘उल्लास – नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत चाचणीचे आयोजन करणे.

६. विद्यार्थ्यांची कला व क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करून घेणे.

शैक्षणिक कामकाज नियोजन सप्टेंबर २०२६ चौथा आठवडा

१. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती (२५ सप्टेंबर) अंत्योदय दिवस साजरा करणे.

२. UDISE + पोर्टलवर शाळा, विद्यार्थी, शिक्षक यांची माहिती अंतिम करणे व शाळेचा ड्रॉप बॉक्स शून्य करणे.

३. रंगोत्सव कार्यक्रमात सहभागी होणे.

४. विद्यार्थ्यांचे वजन व उंची यांची नोंद घेणे.

५. विद्यार्थ्यांची कला व क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करून घेणे.

६. शिक्षण परिषदेमध्ये सक्रिय सहभाग घेणे.

‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत उपक्रम राबवावे – संगणकाची ओळख, कला, शिल्पकला इत्यादी.

शैक्षणिक कामकाज नियोजन जून २०२६ ते मे २०२७ दिनदर्शिका PDF Download

अधिक माहितीसाठी : शैक्षणिक कामकाज नियोजन जून २०२६ ते मे २०२७ दिनदर्शिका PDF डाउनलोड करा

SCERT शालेय वेळापत्रक PDF डाउनलोड | School Time Table 2026-27

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment