Pavitra Portal Pesa Shikshak Bharti 2026 : पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीतील शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
पवित्र पोर्टलअंतर्गत शिक्षक पदभरतीतील शिफारसप्राप्त पात्र उमेदवारांना पदस्थापना देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे.
याअनुषंगाने कळविण्यात आले आहे की, एकूण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी प्रत्येक शाळेत कोणत्या विषयाची किती पदे भरली जातील याबाबत प्रथमतः निश्चिती करावी.

आश्रमशाळेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहे ही बाब लक्षात घेता, पवित्र पोर्टलअंतर्गत शिफारसप्राप्त पात्र नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना न देता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या विचारात घेऊन, रिक्त पदे समप्रमाणात भरली जातील याप्रमाणे नियोजन करून पदस्थापना द्यावी. आश्रमशाळेत सर्व विषयांसाठी शिक्षक उपलब्ध होतील याप्रमाणे नियोजन करण्यात यावे, ही विनंती.

पवित्र पोर्टल पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक प्रसिद्ध डाउनलोड डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांची भरती प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेला ३ सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे.
नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून या प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
Pavitra Portal Pesa Shikshak Bharti 2026
आदिवासी विकास विभागांतर्गत पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक संवर्गातील एकूण २ हजार ४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या भरती प्रक्रियेत मुलाखतीविना निवडीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी शिक्षण आयुक्तालयाकडून आदिवासी विकास विभागाला प्राप्त झाली आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील एकूण १ हजार ६०० उमेदवारांचा समावेश आहे.
यामध्ये :
- प्राथमिक शिक्षक – ९२७ उमेदवार
- माध्यमिक शिक्षक – ४२१ उमेदवार
- उच्च माध्यमिक शिक्षक – २५२ उमेदवार
यापैकी पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार १४१ उमेदवार आहेत.
नाशिक विभागात सर्वाधिक उमेदवार
विभागनिहाय विचार करता नाशिक विभागातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.
- नाशिक विभाग – ५८८
- ठाणे विभाग – ४२४
- नागपूर विभाग – २९६
- अमरावती विभाग – २९२
संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसह भरतीसाठी आवश्यक असलेल्या इतर मूळ कागदपत्रांची पडताळणी निर्धारित केंद्रांवर केली जात आहे.
पेसा क्षेत्रातील पदांचा तपशील
पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांमध्ये पुढील पदांचा समावेश आहे :
- प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) – १९६
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – १६
- माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) – ९४
- माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – २
- उच्च माध्यमिक शिक्षक – १५१
नॉन-पेसा क्षेत्रातील पदांचा तपशील
नॉन-पेसा क्षेत्रात पुढील पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे :
- प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) – ५९३
- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – १२२
- माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) – ३०२
- माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – २३
- उच्च माध्यमिक शिक्षक – १०१
कागदपत्र पडताळणी चेक लिस्ट |Pavitra Portal Documents List
कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

याशिवाय जाहिरातीनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (स्वयंप्रमाणित) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे.
उमेदवारांनी त्यांना निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांक, वेळ आणि ठिकाणी वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले की, शासकीय आश्रमशाळांमधील पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून, त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संबंधित उमेदवारांनी निर्धारित ठिकाणी, दिनांक आणि वेळेनुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रक PDF
पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील अद्ययावत सूचना, पात्र उमेदवारांची यादी आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळापत्रकासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी.
- अपर आयुक्त ठाणे अंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती-२०२६ वेळापत्रक
- अपर आयुक्त नाशिक अंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती-२०२६ वेळापत्रक
- अपर आयुक्त अमरावती अंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती-२०२६ वेळापत्रक
- अपर आयुक्त नागपूर अंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती-२०२६ वेळापत्रक
अधिकृत संकेतस्थळ : https://tribal.maharashtra.gov.in/
पवित्र पोर्टल शिक्षक भरती शिफारस याद्या जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक













