Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

ITI Admission Maharashtra 2026 प्रवेश प्रक्रिया सुरू, आवश्यक पात्रता,कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, कोर्स लिस्ट, संपूर्ण माहिती

ITI Admission Maharashtra 2026

ITI Admission Maharashtra 2026 : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ऑगस्ट २०२६ सत्रासाठी आयटीआय प्रवेश प्रक्रियेची घोषणा admission.dvet.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे. दहावी किंवा बारावीनंतर व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ITI Admission 2026‘ ही एक अत्यंत महत्त्वाची संधी असते.

राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) प्रवेश हे आता केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच (Centralized Online Admission Process) केले जाणार आहेत.

या लेखामध्ये आपण ITI प्रवेशासाठी लागणारी आवश्यक पात्रता, आयटीआय फॉर्म कसा भरायचा?,आवश्यक कागदपत्रे, आयटीआय मध्ये कोण कोणते कोर्स असतात? Govt ITI courses list आणि ऑनलाईन अर्ज कसा व कोठे करावा याविषयी सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे. सोबतच महत्वाच्या अधिकृत लिंक , माहिती पुस्तिका PDF लिंक आर्टिकल मध्ये दिली आहे.

ITI प्रवेशासाठी लागणारी आवश्यक पात्रता | ITI Admission Eligibility

दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी (ITI Admission 2026) पात्र असतात. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये गणित, विज्ञान किंवा तांत्रिक विषय घेतले आहेत, त्यांना प्रवेशाच्या वेळी गुणवत्ता यादीत प्राधान्य मिळते. प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार भारताचा नागरिक असणे आणि आरक्षणासाठी तो महाराष्ट्राचा अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे | ITI Admission Documents

आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठी काही महत्त्वाची कागदपत्रे अर्ज करतेवेळी आणि पडताळणीवेळी जवळ असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्याचे आधार कार्ड, दहावी किंवा बारावीची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (TC), आणि रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) यांचा समावेश होतो.

जर उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गातून येत असेल, तर जातीचा दाखला आणि चालू वर्षाचे नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे . याव्यतिरिक्त, अपंगत्व, संरक्षण किंवा क्रीडा प्रवर्गातून आरक्षण मिळवायचे असल्यास संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याचे मूळ प्रमाणपत्र आवश्यक असते.

आयटीआय मध्ये कोण कोणते कोर्स असतात? Govt ITI courses List

राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) विविध प्रकारचे तांत्रिक आणि अतांत्रिक कोर्सेस उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आणि उद्योगांच्या मागणीनुसार फिटर (Fitter), इलेक्ट्रिशियन (Electrician), मोटर मेकॅनिक, वेल्डर आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स यांसारखे अनेक रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यामध्ये निवडता येतात. दहावीच्या गुणांवर आधारित गुणवत्ता क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना हे कोर्सेस दिले जातात.

महत्त्वाच्या तारखा | ITI Admission 2026 Important Dates

ITI Admission 2026 Start Date Maharashtra : सन 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी (ITI Admission 2026) प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक DVET च्या अधिकृत पोर्टलवर जाहीर करण्यात आले आहे.

  • ऑनलाईन नोंदणी (Registration) व अर्ज भरण्यास सुरुवात: २१ मे २०२६
  • आयटीआय केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज निश्चित करणे: २१ मे २०२६
  • व्यवसाय आणि संस्थानिहाय प्राधान्यक्रम (Option Form) भरण्यास सुरुवात: १ जून २०२६
  • पुढील सविस्तर वेळापत्रक: दहावीच्या मूळ गुणपत्रिकांचे शाळांमधून वाटप झाल्यानंतर, गुणवत्ता यादी (Merit List) आणि प्रवेशाच्या पुढील फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रक संचालनालयाकडून https://admission.dvet.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले जाईल.

उमेदवारांनी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी विकल्प फॉर्म (Option Form) भरण्याच्या तारखा, गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर होण्याच्या तारखा आणि प्रवेश निश्चितीच्या अंतिम तारखा समजून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील ‘Notifications‘ विभागाला नियमित भेट द्यावी.

आयटीआय फॉर्म कसा भरायचा? | ITI Admission Online Registration 2026

ITI प्रवेश Form भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत पोर्टलवर जाऊन नवीन उमेदवार नोंदणी (New Candidate Registration) करणे गरजेचे आहे.

ITI Admission Online Registration 2026

नोंदणीनंतर प्राप्त झालेल्या युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करावे. यानंतर वैयक्तिक माहिती, पत्ता, पालकांचा तपशील, प्रवर्ग आणि शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी लागते . सर्व माहिती भरून झाल्यानंतर प्रोफाईल लॉक करून अर्जाचे शुल्क भरा आणि शेवटी अर्जाची प्रिंट काढून घ्या.

ITI Admission Maharashtra 2026 Sign In

ITI Admission Online Registration 2026 Step By Guide PDF Download Click Here

ऑनलाईन अर्ज कसा व कोठे करावा?

आयटीआय प्रवेशासाठी उमेदवारांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://admission.dvet.gov.in येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

Dvet Govt Maharashtra पोर्टलवर जाऊन उमेदवारांनी स्वतःचा चालू मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. मोबाईलवर येणारा ओटीपी (OTP) टाकून पडताळणी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला प्रत्यक्ष फॉर्म भरता येतो.

प्रवेश अर्ज शुल्क | Application Fee Details

अर्जातील सर्व माहिती भरून झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे शुल्क जमा करावे लागते. प्रवेश अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.

  • राखीव प्रवर्ग (Reserved Category): रु.१००
  • महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु.३००
  • अराखीव प्रवर्ग (Unreserved Category): रु. १५०
  • अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु.५००

प्रवेश अर्ज शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर त्याची पावती (Payment Receipt) डाऊनलोड करून स्वतःजवळ सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

अर्ज निश्चित करणे आणि कागदपत्रे पडताळणी

ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे अर्ज निश्चित करणे आणि कागदपत्रे पडताळणी त्यासाठी उमेदवारांनी आपल्या तात्पुरत्या अर्जाची प्रिंट आणि सर्व मूळ कागदपत्रांचा संच घेऊन पडताळणीसाठी जवळच्या कोणत्याही शासकीय किंवा खाजगी आयटीआय संस्थेत जावे.

कागदपत्रे पडताळणी पथक तुमच्या कागदपत्रांची तपासणी करतील आणि अर्जातील माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यावर तुमचा अर्ज ऑनलाईन निश्चित (Confirm) करतील.

अर्ज निश्चित झाल्यावर तुम्हाला ‘Application Confirmation Slip‘ दिली जाते. या पडताळणीसाठी उमेदवाराकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही आणि निश्चित केलेल्या अर्जाचाच प्रवेश फेऱ्यांसाठी विचार केला जातो.

प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी (Application Confirmation) व प्रवेश निश्चित (Admission Confirmation) करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी प्रवेश अर्जात तसेच, संकेतस्थळावर Download या मथळ्याखाली व माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी माहिती पुस्तिका येथे डाउनलोड करा.

अतिरिक्त गुण आणि आरक्षण | Additional Marks and Weightage

काही विशेष कौशल्ये आणि पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीसाठी अतिरिक्त गुण दिले जातात. जर उमेदवाराने इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा दहावीत तांत्रिक विषय घेतला असेल, तर त्यांना १० अतिरिक्त गुण मिळतात.

जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभाग असल्यास अनुक्रमे १०, १५ किंवा २० गुण दिले जातात.

तसेच शासन मान्यताप्राप्त बोल्स्टर स्कूलमधून उत्तीर्ण झाल्यास २० गुणांचा फायदा होतो. या सर्व अटींची पूर्तता करत असलात तरीही एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ५० अतिरिक्त गुणांचीच कमाल मर्यादा लागू असते.

ITI माहिती पुस्तिका, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अधिकृत पोर्टल

ITI Admission Maharashtra 2026 प्रवेश प्रक्रिया संदर्भातील सर्व महत्वाची अधिकृत माहितीसाठी खालील PDF डाउनलोड करा.

ITI Admission 2026 Maharashtra Notification
ITI Admission Maharashtra Notification 2026

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment