11th FYJC Online Admission Process 2026-27: शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या इयत्ता 11 वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून, प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होत आहे. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग-1 भरुन नोंदणी करु शकतात. त्यासाठी नोंदणी कशी करावी? याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.
विद्यार्थी नोंदणी | FYJC Admission Student Registration
11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता सर्वात आधी तुम्हाला नोंदणी (11th Admission Registration) करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप Follow करा.
स्टेप 1 : सर्वप्रथम https://mahafyjcadmissions.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
स्टेप 2 : त्यानंतर तिथे ‘Student Registration’ या टॅबवर क्लिक करा.
स्टेप 3 : आता तुम्हाला दोन पर्याय दिसतील 1. Within Maharashtra State (Applicant’s passing standard 10th examination from a school located in Maharashtra State) आणि 2. Outside Maharashtra State
(Applicant’s passing standard 10th examination from a school located Outside Maharashtra State / Outside India) यापैकी योग्य पर्याय निवडा. (पर्याय 1 हा महाराष्ट्र राज्यातील इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे, तर पर्याय 2 हा राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी आहे.)

स्टेप 4 : अर्जदाराची स्थिती (Applicant’s Status) येथे जर तुम्ही पहिल्यांदाच परीक्षा दिली असल्यास ‘Fresher’ हा पर्याय निवडा. जर Repeater असेल (Applicant reappearing for standard 10th examination in 2026) तर हा पर्याय निवडा किंवा Previously Passed (Applicant has passed standard 10th examination earlier than 2026) असेल तर हा पर्याय निवडा.
स्टेप 5 : इयत्ता 10 वी परीक्षा बोर्डाची निवड (10th Standard or Equivalent Examination Board) याठिकाणी तुम्ही तुमच्या खालील पैकी योग्य बोर्डाचे नाव सिलेक्ट करा.
- SSC (Maharashtra State Secondary School Certificate)
- CBSE (Central Board of Secondary Education)
- CISCE/ICSE (Council for the Indian School Certificate Examinations)
- IB (International Baccalaureate)
- IGCSE (International General Certificate of Secondary Education)
- NIOS (National Institute of Open Schooling)
- Any Other Board (Please Specify)
स्टेप 6 : इयत्ता 10 वी परीक्षेचे तपशील (10th Standard or Equivalent Examination Details) या ठिकाणी तुमचा Seat Number, Month Of Examination अचूक तपशील भरा

स्टेप 7 : आता Applicant’s Contact Details मध्ये तुमचा Email ID आणि मोबाईल नंबर अचूक भरा.
स्टेप 8 : आता Security Question Details मध्ये खालील पैकी कोणताही एक प्रश्न सिलेक्ट करून त्यापुढे Security Question’s Answer मध्ये त्याचे उत्तर लिहा आणि ते डायरीत लिहून ठेवा. जेव्हा तुमचा पासवर्ड किंवा लॉगिन आयडी आठवत नसेल त्यावेळी तुम्ही या प्रश्नाच्या मदतीने रिकव्हर करू शकता.
- What is the name of your grand father ?
- Who is your best friend?
- Which is your favourite game?
- Which is your favourite movie?
- Who is your favourite teacher?
स्टेप 9 : आता Password Details (Password must contain one numeric digit from 0 to 9, one lowercase letter, one uppercase letter, one special character, no space, and should be at least 8 character long) भरा जो की, 0 ते 9 पैकी अंक, एक इंग्लिश अक्षर कॅपिटल आणि एक small असेल, one special character म्हणजे #@* यापैकी असे किमान 8 character long असायला पाहिजे.
स्टेप 10 : आता स्क्रीन वर दिसत असलेला Captcha कोड टाका आणि Register वर क्लिक करा.
स्टेप 11 : रजिस्टर बटणावर क्लिक केल्यानंतर स्क्रीन वर तुम्हाला नोंदणी यशस्वी झाल्याचा मॅसेज दिसेल आणि तिथेच तुम्हाला तुमचा Login ID दिसेल तो लिहून घ्या. त्यानंतर तुम्ही आता Maha FYJC Admissions साठी Proceed to Login वर क्लिक करून Login ID आणि Password टाकून लॉगिन करू शकता.
11 वी ऑनलाईन प्रवेश: अधिकृत संकेतस्थळ व हेल्प लाईन नंबर
- Maha FYJC Online Admission Official Website : https://mahafyjcadmissions.in/
- ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in
- हेल्पलाईन नंबर – ८५३०९५५५६४
- FYJC Student Registration Manuals PDF Downlod Here








