Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

FYJC Admission Schedule

FYJC Admission Schedule Special Round 7: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या अंतिम विशेष फेरीत सहभागी होऊन आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे.

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर | FYJC Admission Schedule

FYJC Admission Schedule Special Round 7

संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५,५२,६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १३,४३,४१८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नसल्याने त्यांच्यासाठी ही विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे.

या विशेष फेरीसाठी २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजल्यापासून २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, भाग-१ मधील दुरुस्ती तसेच भाग-२ भरून अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य राहणार आहे.

प्रवेश वाटपाचे वेळापत्रक

२५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रवेश वाटप प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता प्रवेश वाटपाची यादी, कट-ऑफ यादी तसेच विद्यार्थ्यांना SMS द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रवेश वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी २५ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून शुल्क भरावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा.

यानंतर २८ ऑगस्ट रोजी प्रशासकीय कामकाज, २९ ऑगस्ट रोजी डेटा प्रोसेसिंग करण्यात येणार असून ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रिक्त जागांची पुढील माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

महत्त्वाचे: ही विशेष फेरी प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी, पसंतीक्रम भरणे, अर्ज लॉक करणे आणि प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

FYJC 11th Admission 2026-27 महत्वाच्या लिंक

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment