Maharashtra School Holiday List 2026 27: नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वांनाच शाळेच्या सुट्ट्यांची उत्सुकता असते. सुट्ट्यांचे योग्य नियोजन करता यावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षातील शाळांच्या सुटयांची यादी जाहीर केली आहे.
शालेय सुट्ट्यांची यादी 2026-27 | Maharashtra School Holiday List 2026 27
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शालेय सुट्ट्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे.
- २६ जून २०२६ (शुक्रवार): मोहरम ताजिया
- २५ जुलै २०२६ (शनिवार): आषाढी एकादशी
- १५ ऑगस्ट २०२६ (शनिवार): स्वातंत्र्यदिन / पतेती (पारशी नववर्ष दिन)
- २६ ऑगस्ट २०२६ (बुधवार): ईद-ए-मिलाद
- २८ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार): रक्षाबंधन
- ०५ सप्टेंबर २०२६ (शनिवार): जन्माष्टमी (गोपाळकाला)
- १४ सप्टेंबर २०२६ (सोमवार): गणेश चतुर्थी
- १८ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार): गौरी पूजन (मा. विभागीय आयुक्त)
- २५ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार): अनंत चतुर्दशी (मा. विभागीय आयुक्त)
- ०२ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार): महात्मा गांधी जयंती
- ११ ऑक्टोबर २०२६ (रविवार): घटस्थापना
- २० ऑक्टोबर २०२६ (मंगळवार): विजयादशमी (दसरा)
- ०२ नोव्हेंबर २०२६ ते १४ नोव्हेंबर २०२६: दिवाळी सुट्टी
- ०६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार): धनत्रयोदशी (मा. विभागीय आयुक्त)
- १० नोव्हेंबर २०२६ (मंगळवार): दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा)
- ११ नोव्हेंबर २०२६ (बुधवार): भाऊबीज
- २४ नोव्हेंबर २०२६ (मंगळवार): गुरूनानक जंयती
- २५ डिसेंबर २०२६ (शुक्रवार): ख्रिसमस (नाताळ)
- १५ जानेवारी २०२७ (शुक्रवार): मकर संक्रांत
- २६ जानेवारी २०२७ (मंगळवार): प्रजासत्ताक दिन
- १९ फेब्रुवारी २०२७ (शुक्रवार): छत्रपती शिवाजी महाराज जयंती
- ०६ मार्च २०२७ (शनिवार): महाशिवरात्री
- १० मार्च २०२७ (बुधवार): रमझान ईद (ईद उल फितर)
- २२ मार्च २०२७ (सोमवार): धुलिवंदन (होळीचा दुसरा दिवस)
- ०७ एप्रिल २०२७ (बुधवार): गुढीपाडवा
- १४ एप्रिल २०२७ (बुधवार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- १५ एप्रिल २०२७ (गुरुवार): रामनवमी
- १८ एप्रिल २०२७ (रविवार): महावीर जंयती
- २३ एप्रिल २०२७ (शुक्रवार): गुडफ्रायडे
- ०१ मे २०२७ (शनिवार): महाराष्ट्र दिन
- ०३ मे २०२७ ते १४ जून २०२७: उन्हाळी सुट्टी
- २१ मे २०२७ (शुक्रवार): बुध्दपौर्णिमा

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आणि प्रथम सत्र
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात सोमवार, १५ जून २०२६ रोजी होणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी हे प्रथम सत्र १५ जून पासून सुरू होऊन ते शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार असून, या कालावधीत शासनाने घोषित केलेल्या सर्व सार्वजनिक सुट्ट्या शाळांना लागू असणार आहे.
दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचे वेळापत्रक
नव्या शैक्षणिक 2026 या वर्षातील विद्यार्थी ज्या सुट्ट्यांची सर्वात जास्त आतुरतेने वाट पाहतात, ती म्हणजे दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी, यावर्षी दिवाळीची सुट्टी सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू होईल आणि ती शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राहील.
दिवाळी सुट्टी संपल्यानंतर लगेचच म्हणजे सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळेचे द्वितीय सत्र सुरू होईल. द्वितीय सत्र हे १ मे २०२७ पर्यंत असणार आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांची आवडती उन्हाळी सुट्टी सोमवार, ३ मे २०२७ पासून सुरू होईल आणि उन्हाळी सुट्टी ही १४ जून २०२७ पर्यंत राहील.
सुट्ट्यांचे नियोजन आणि मुख्याध्यापकांचे अधिकार
शालेय सुट्ट्यांबाबत महत्त्वाचे नियम परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार माध्यमिक शाळा संहितेनुसार, कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या ७६ दिवसांपेक्षा जास्त असणार नाहीत याची दक्षता शाळांना घ्यावी लागते. तसेच, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वर्षातील एकूण कामाचे दिवस किमान २३० असणे अत्यंत आवश्यक आहे.
काही विशेष सणांसाठी, जसे की गणेशोत्सव, नाताळ निमित्त शाळांना उन्हाळ्याची आणि दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्या ऐवजी सुट्ट्यांचे समायोजन करता येऊ शकते, परंतु यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच मुख्याध्यापक स्वतःच्या अखत्यारीत काही स्थानिक सुट्ट्या निश्चित करू शकतात व त्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना देणे गरजेचे असते.
मा. जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक जिल्हयासाठी निश्चित केलेल्या स्थानिक सुट्टया तसेच शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेल्या सर्वच सार्वजनिक सुट्टया शाळांनी घेणे बंधनकारक आहे.
तसेच दि. 1 मे रोजी ‘महाराष्ट्र दिन‘ साजरा करणे बाबत शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर हे कर्मचारी सोडून इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्टया अनुज्ञेय नाहीत. मात्र दीर्घ सुट्टयांच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्टया असतील त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय राहतील. तसेच शासकीय सुट्टया शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय राहतील. असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी: नवीन शैक्षणिक वर्षातील शालेय सुट्ट्यांची संपूर्ण यादी बाबतचे परिपत्रक डाउनलोड करा
निष्कर्ष
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शालेय सुट्ट्यांची यादी (Maharashtra School Holiday List 2026 27) विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाची आहे. जेणेकरून या सुटयांनुसार तुम्ही तुमच्या कौटुंबिक सहलींचे, सणांचे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे वर्षभराचे अचूक नियोजन आधीच करून ठेवू शकता.
शालेय नियमांनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत आणि किमान २३० दिवस शाळेचे कामकाज चालणे अनिवार्य आहे. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष २०२७-२८ हे मंगळवार, १५ जून २०२७ रोजी सुरू होणार आहे.
अभ्यास आणि विश्रांती यांचा योग्य समतोल साधण्यासाठी या सुट्ट्यांचा पुरेपूर आणि योग्य वापर करा. ही शालेय सुट्ट्यांची यादी तुमच्या मित्र-परिवारासोबत आणि इतर पालकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यास मदत होईल. नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा!










