CTET Exam Date 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET च्या 22 व्या आवृत्तीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर आता उमेदवारांचे लक्ष CTET Exam Date 2026 कडे लागले होते. परीक्षेची सुधारित तारीख (CTET Exam New Date 2026) जाहीर करण्यात आली आहे. Admit Card कधी मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती. तसेच PREVIOUS YEAR QUESTION PAPER (CTET Question Paper Feb 2026) डाउनलोड डायरेक्ट लिंक या लेखात दिली आहे.
New Update : CTET Exam Date Release 2026
Table of Contents
CTET परीक्षा तारीख 2026 जाहीर
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test – CTET) ची २२ वी आवृत्ती दिनांक १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रत्येक उमेदवाराला परीक्षा शहर (Examination City) आणि परीक्षा दिनांक याबाबतची माहिती परीक्षा होण्याच्या १५ दिवस आधी CTET च्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल.
तसेच, परीक्षा केंद्राची (Examination Centre) माहिती असलेले प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी CTET पोर्टलवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
CBSE च्या 25 ऑगस्ट 2026 रोजीच्या सार्वजनिक सूचनेनुसार, CTET च्या 22 व्या आवृत्तीसाठी यापूर्वी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 मे 2026 ते 10 जून 2026 या कालावधीत सुरू होती.
त्यानंतर काही पात्र उमेदवारांना अर्ज करता यावा यासाठी ऑनलाइन अर्ज पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले. ही अतिरिक्त अर्ज प्रक्रिया 25 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत होती. मात्र त्यास पुन्हा 6 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
त्यामुळे CBSE ने स्पष्ट केले आहे की, 22 व्या CTET परीक्षेची सुधारित तारीख (CTET Exam New Date 2026) ऑनलाइन अर्ज पोर्टल बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. त्यामुळे आता CTET Exam Online Application Correction Window अर्जातील दुरुस्तीसाठी 10 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. Admit Card साठी उमेदवारांनी अधिकृत CTET वेबसाइटवरील पुढील सूचनेकडे लक्ष ठेवावे.
PUBLIC NOTICE: Exam Dates for 22nd edition of CTET

पूर्वी CTET परीक्षा कोणत्या तारखेला होणार होती?
CTET च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध 2026 च्या माहितीनुसार, मागील म्हणजे 21 वी CTET परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. अधिकृत निकाल सूचनेतही ही परीक्षा 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच अधिकृत CTET वेबसाइटच्या संग्रहात 7 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या तारखांशी संबंधित प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत.
मात्र, CTET च्या 22 व्या आवृत्तीची नवीन किंवा सुधारित परीक्षा तारीख या सार्वजनिक सूचनेत नमूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील किंवा अनधिकृत तारखांवर विश्वास न ठेवता CBSE कडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
CTET Hall Ticket 2026 कधी येणार?
परीक्षा केंद्राची (Examination Centre) माहिती असलेले प्रवेशपत्र (Admit Card) परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच दिनांक १२ आणि १३ डिसेंबर २०२६ रोजी परीक्षा असल्याने दोन दिवस आधी हॉल तिकीट CTET पोर्टलवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल असे दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या सुचनेत जाहीर करण्यात आले आहे.
CTET Hall Ticket Date 2026 : 10 December
म्हणून उमेदवारांनी आतापासूनच CTET च्या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे लक्ष ठेवावे. अधिकृत वेबसाइटवर परीक्षा तारीख, CTET Admit Card 2026 Link आणि इतर महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या जातील.
CTET Exam Date आणि Hall Ticket साठी अधिकृत वेबसाइट
उमेदवारांनी CTET परीक्षा तारीख आणि Hall Ticket बाबतची माहिती केवळ अधिकृत वेबसाइटवरूनच तपासावी. सध्या अधिकृत CTET वेबसाइटवर 22 व्या आवृत्तीच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भातील सूचना उपलब्ध असून परीक्षा तारीख जाहीर झाल्यानंतर नवीन अपडेट तेथे प्रसिद्ध करण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट: CTET Official Website
सीटीईटी (CTET) करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक संपूर्ण माहिती
PREVIOUS YEAR QUESTION PAPER (CTET Question Paper Feb 2026)
















