Latest Postsशालेय शिक्षणशासन निर्णयप्रवेश प्रक्रियादिव्यांग विशेषसेवा विषयक

199 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे तातडीचे निर्देश

अतिरिक्त शिक्षकांचे शाळांमध्ये समावेशन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे.

atirikt shikshak samayojan update

Atirikt Shikshak Samayojan Update : मुंबईतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांपैकी अद्याप 199 शिक्षकांचे समायोजन प्रलंबित आहे. या शिक्षकांची पात्रता तपासून त्यांचे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किंवा रात्रशाळांमध्ये तातडीने समायोजन करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

विधान परिषद सदस्य ज. मो. अभ्यंकर यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर, संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांच्यासह संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.

राज्यातील अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रक डाउनलोड करा

बैठकीत मुंबईतील रात्रशाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रात्रशाळांमधील दुबार शिक्षकांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या आधारे त्यांचे प्रलंबित वेतन देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

शिक्षकांची वैद्यकीय देयके अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्यास आवश्यक निकष निश्चित करून ती प्रकरणे मार्गी लावावीत, असे निर्देशही देण्यात आले. प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक तसेच माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या संचित अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबत आवश्यकतेनुसार नियमांमध्ये बदल करण्याच्या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली.

याशिवाय, सत्राच्या मध्यात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सत्र समाप्तीपर्यंत पुनर्नियुक्ती दिल्यानंतर त्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमधून देता येत नसल्याची प्रकरणे किती आहेत, याची तपासणी करण्याच्या सूचना मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. अशा कर्मचाऱ्यांना मानधन देण्याबाबतही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

यापुढे सत्राच्या मध्यात शिक्षक किंवा कर्मचारी निवृत्त होणार असल्यास त्यांच्या जागी आधीपासूनच पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे.

राज्यातील अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत शासन निर्णय व परिपत्रक डाउनलोड करा

Shikshan Mitra

शिक्षण मित्र (shikshanmitra.in) ही एक विश्वसनीय शैक्षणिक वेबसाईट आहे. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी बाबत अचूक, अद्ययावत आणि उपयुक्त माहितीसाठी अवश्य फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment